सोमय्यांचा मुखवटा लावलेल्या व्यक्तीला शिवसैनिकांचं निवेदन, मुखवटा घातलेला कार्यकर्ता काय म्हणाला?
पिंपरी चिंचवड महापालिकेत आज शिवसेनेनं भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा खोटा चेहरा समोर आणण्यासाठी अनोखं आंदोलन. मुखवटा परिधान करून सोमैयांना आंदोलनात सामील केलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीत 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसं पत्र सोमैयांना लिहीत पुढाकार घेण्याची आणि ईडी-सीबीआयद्वारे चौकशी लावावी अशी मागणी केली. त्याच घोटाळ्याची फाईल आज मुखवटा परिधान केलेल्या सोमैयांच्या हाती सोपविण्यात आली. खऱ्याखुऱ्या सोमैयांनी यावर पलटवार केला असला तरी मुखवटाधारी सोमैय्यानी मात्र ईडी-सीबीआय द्वारे चौकशी करायला लावू. असं आश्वासन दिलं. पण नंतर मुखवटा फाडून हा खोटा सोमैयां असल्याचं म्हणत खरा चेहरा शिवसेनेनं समोर आणला.