Shiv Jayanti 2021 | शिवजयंतीला रायगडवर नेत्रदीपक रोषणाई; खा. श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

छत्रपती शिवरायांच्या 391 व्या जयंतीनिमित्त राजधानी किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात येणार आहे. राज सदरसह रायगडवरील विविध वास्तू उजळणार आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी किल्ले रायगडला भेट दिली होती. यावेळी किल्ल्यावरील महत्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तातडीने त्यांनी पुरातत्व विभागाचे राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधून रायगडवर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यासाठी मागणी केली. त्यावेळी विद्युत रोषणाई करण्यासाठी आवश्यक फंड नसल्याचे यादव यांनी सांगितले. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जो ही फंड लागेल मी देतो, मात्र रायगड अंधारात ठेवू नका अशा सूचना केल्या. त्यानुसार मागणीचे पत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व विभागाला दिले. या मागणीवर पुरातत्व विभागाने तातडीने मंजुरी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola