Shiv Jayanti 2021 | 'सी फोर्ट सर्किट टूरिझम'च्या माध्यमातून जलदुर्ग जोडावेत : MP Sambhaji Raje UNCUT

Continues below advertisement

पुणे: राज्याची राजधानी मुंबई आणि स्वराज्याची राजधानी रायगड यांना 'सी फोर्ट सर्किट टूरिझम'च्या माध्यमातून जोडण्यात यावे अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास जगभरात पोहचवायचा असेल तर मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना रायगडशी जोडलं गेलं पाहिजे. हे 'सी फोर्ट सर्किट टूरिझम' म्हणजे जलदुर्गाच्या माध्यमातून जोडायला हवं. मुंबईतून समुद्रामार्गे रायगडला निघताना खांदेरी, उंदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, मुरुड जंजीरा हे किल्ले येतात. तिथून काही किलोमीटरवर रायगड किल्ला येतो. त्यामुळे हे किल्ले एकमेकांना समुद्रामार्गे जोडले तर पर्यटक वाढतील, शिवरायांचा इतिहास जगभर पोहचेल."\

कोल्हापूरचे छत्रपती घराणे शिवरायांच्या संबंधी कामाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिल्याचं सांगत छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, "शाहू महाराजांनी पुण्यात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरा करायला सुरुवात केली. छत्रपती राजाराम महाराजांनीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकले. आता मला रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शिवरायांची सेवा करायला मिळतेय."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram