Shirdi : ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहत साईबाबा संस्थान सतर्क, नियमावली जाहीर होण्याची शक्यता
चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानाकडून स्वतंत्र नियमावली आज जाहीर होऊ शकते. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.