Shirdi: साई दर्शनासाठी शिर्डी ग्रामस्थांना ओळखपत्र सक्ती,न्यायालयाच्या सुरक्षेच्या आदेशानंतर निर्णय
Continues below advertisement
Shirdi: साई दर्शनासाठी शिर्डी ग्रामस्थांना ओळखपत्र सक्ती,न्यायालयाच्या सुरक्षेच्या आदेशानंतर निर्णय
आता बातमी आहे साईंच्या शिर्डीतून... सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डी साई मंदिरात दर्शनासाठी जाताना शिर्डी ग्रामस्थांना आता ओळखपत्र सक्ती करण्यात आलीय. न्यायालयाच्या सुरक्षेच्या आदेशानंतर मंदिर सुरक्षा विभागाकडून निर्णय घेण्यात आलाय. नवीन दर्शनरांग सुरू झाल्यानंतर शिर्डी ग्रामस्थांसाठी दररोज दर्शन घेण्यासाठी गावकरी गेट तसेच ४ नंबर प्रवेशद्वारातून प्रवेश मिळतो.तसेच साई मंदिर परिसरात , प्रशासकीय कामासाठी जाताना ग्रामस्थ आणि भाविकांना ओळखपत्र दाखवूनच प्रवेश दिला जाणार आहे. तसंच सामान्य भक्तांना मात्र नवीन दर्शन रांगेतून असलेल्या दर्शन व्यवस्थेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही..
Continues below advertisement