Saibaba Punyatithi | साई पुण्यतिथीचं 107 वं वर्ष, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

Continues below advertisement
शिर्डीमध्ये साईबाबांची 107 वी पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जात आहे. सकाळी काकड आरतीनंतर साई समाधी मंदिरातून साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथी सवाद्य मिरवणुकीने दर्शनासाठी काढण्यात आली. मंदिर फुलांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. भाविकांची मोठी गर्दी झाली असून, आज मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. भिक्षाजोळी सोहळा आणि आराधना विधी यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. शिर्डीमध्ये श्रद्धेचा महासागर उसळला आहे. अखंड पारायणाची समाप्ती झाली असून, साई दर्शनाला सुरुवात झाली आहे. केवळ राज्यभरातूनच नव्हे, तर देशभरातून आलेले साई भक्त साईबाबांपुढे नतमस्तक होत आहेत. आजचा दिवस संपूर्ण भारतात विजयादशमी उत्सव म्हणून साजरा केला जातो, परंतु शिर्डीमध्ये विजयादशमीसोबत पुण्यतिथी उत्सव साजरा होतो. आजच्या दिवशी बाबांचे महानिर्वाण झाले होते. साईबाबांनी आपल्या हयातीत भिक्षा मागून भुकेल्यांना अन्न दिले होते. तीच परंपरा साईबाबा संस्थानने सुरू ठेवली आहे. भिक्षाजोळीच्या माध्यमातून शहरात धान्याच्या स्वरूपात भिक्षा मागितली जाते. मिळालेले धान्य साईबाबा संस्थानच्या आशियातील सर्वात मोठ्या भोजनालयात जमा करून सर्व साईभक्तांना मोफत भोजन प्रसाद दिला जातो. साईभक्त दसऱ्याचा सण उत्साहात साजरा करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola