Sai Baba | साईंच्या जन्मस्थळावरुन आजपासून शिर्डीत बेमुदत बंद | ABP Majha
पाथरीला साईबाबांचंच जन्मस्थळ घोषित करण्याला तीव्र विरोध करत शिर्डीत आजपासून बेमुदत बंदला सुरुवात झाली आहे. शिर्डीत पहिल्यांदाच बंद पुकारण्यात आलाय. बंद पुकारण्यात आला असला तरी शिर्डीत साई मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. शनिवारी शिर्डीत ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी शिर्डीलगतच्या ग्रामस्थांनी देखील हजेरी लावली आणि आजपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय एकमुखानं मंजुर केला. तर दुसरीकडे शिर्डीच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी सुरुवातीला पाथरीच्या रहिवाशांनी देखील बंद पुकारला होता. मात्र, सोमवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्यानं पाथरीवासियांनीं बंद मागे घेतला आहे.