Eknath Shinde Dasara Melava : एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर, पाहा नेमकं काय?
Continues below advertisement
शिंदेसेनेने दसरा मेळाव्यासाठी नवीन टीजर प्रदर्शित केला आहे. या टीजरमध्ये ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर भाष्य करण्यात आले आहे, "महाराष्ट्रात बँड फक्त एकच, बाळासाहेबांचा शिवसैनिकच" असे म्हटले आहे. हिंदुत्वाचे देणं आणि भगव्याचे लेणं या शब्दांत दसरा मेळाव्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. यंदाचा दसरा मेळावा शेतकर्यांच्या बांधावर साजरा केला जाईल, असेही टीजरमध्ये नमूद आहे. "परंपरा जपणं, ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्केच राजकारण करणं, शिवसेनाप्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणारही नाही" या विचारांवर शिंदेसेना ठाम असल्याचे सांगितले आहे. मेळाव्याचे स्थळ NESCO Goregaon, Mumbai येथे असून, "स्थळ बदललंय, परंपरा नाही" हा महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे थोरण असल्याचेही टीजरमध्ये म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement