Shinde Group Shivaji Park: मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर शिंदे समर्थक आमदारांचं बाळासाहेबांना वंदन

Shinde Group Shivaji Park : शिंदे सरकारच्या विस्तारात शपथ घेतलेल्या शिंदे समर्थक 9 मंत्र्यांनी आज एकत्रितपणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली... दादरच्या शिवाजी पार्कमधील स्मृती स्थळी भेट देऊन या नव्या मंत्र्यांनी अभिवादन केलं.. याआधी शिंदे समर्थक आमदारांनी बहुमत चाचणी झाल्यानंतर आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी भेट दिली होती. आज मंत्री येणार असल्यानं या परिसरात मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचे पोस्टर्स लावण्यात आले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola