
Shinde Fadnavis Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं?
Continues below advertisement
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल रात्री उशिरा नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलं याचा तपशील एबीपी माझाच्या हाती लागला आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार, हे कालच्या बैठकीत ठरलंय असं सूत्रांकडून कळतंय. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांना स्थान मिळणार आहे. शिंदेच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद येणार, अशी सूत्रांची माहिती आहे. कुणाला मंत्री करायच हा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवल्याची माहिती मिळतेय. मात्र यामुळे राज्यातील दोन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची मंत्रिपदं धोक्यात येण्याची शक्यता आहे. कालच्या दिल्ली बैठकीत केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Devendra Fadnavis Ekanth Shinde Maharashtra Politics Shinde Fadnavis Cabinet Expansion