Gajanan Maharaj Prakat Din | शेगावमध्ये गजानन महाराज प्रकट दिन सोहळा, हजारो भाविक विदर्भाच्या पंढरीत
विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावमध्ये आज गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा साजरा होत आहे. त्यासाठी हजारो भाविक या सोहळ्यासाठी संतनगरी शेगाव दाखल झाले आहेत. श्रीसंत गजानन महाराज हे 142 वर्षापूर्वी शेगाव इथे प्रकट झाले होते. त्याठिकाणी त्यांनी आपलं जीवन शेगाव वासियांच्या सहवासात घालवलं. आज पहाटे चार वाजल्यापासूनच भाविकांनी संतनगरी शेगाव मोठी गर्दी केली आहे.