New Year 2020 | नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी | शेगाव | ABP Majha

बुलडाण्याच्या शेगावमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय. श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाने भाविकांनी नववर्षाचे स्वागत केलंय. गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. मंगळवारी संध्याकाळपासूनच भाविक हजारोंच्या संख्येने भाविक शेगावमध्ये दाखल झाले. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी अनेकांनी संत नगरी शेगाव गाठून श्रींच्या चरणी नतमस्तक झाले. भाविकांसाठी संस्थानच्या वतीने महाप्रसाद आणि दर्शनाची व्यवस्था करण्यात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola