Shefali Jariwala Death | बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
अभिनेत्री शेफाली जरीवाल यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बिग बॉस आणि 'काँटा लगा' गाण्यानं प्रसिद्ध झालेल्या शेफाली यांना अंधेरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. सध्या शेफाली यांचं पार्थिव कूपर रुग्णालयात असल्याची माहिती आहे.