Sheetal Mahtre Full PC : मातोश्री, घोसाळकर ते उद्धव ठाकरे... व्हायरल व्हिडिओनंतर म्हात्रे आक्रमक
Sheetal Mahtre Full PC : मातोश्री, घोसाळकर ते उद्धव ठाकरे... व्हायरल व्हिडिओनंतर म्हात्रे आक्रमक
Sheetal Mhatre On Viral Video: एखाद्या महिलांविरोधात बोलण्यासारखं काही नसेल, तीच चारित्र्यहनन करणं किती सोपं असतं. ती महिला कुठेतरी काम करत असते. तिच्याबद्दल बोलण्यासाठी काही नसलं, तिच्या कामावर कुठेही बोट ठेवण्यास जागा नसली की, तीच चारित्र्यहनन करणं खूप सोपं असतं, असं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. या व्हिडीओ मॉर्फ करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला होता. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्या असं म्हणाल्या आहेत.
त्या म्हणल्या (Sheetal Mhatre On Viral Video) की, ''काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागाठणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमाला आले होते. तिथे एक व्हिडीओ काढून, त्यावर चुकीच्या पद्धतीने गाणं टाकून आणि चुकीचा संदेश लिहून मात्रोश्री या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. यानंतर जवळपास एक तासात 350 लोकांनी तो शेअर केला. ठाकरे गटाच्या जवळपास सगळ्याच पेजवर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला.'' ठाकरे गटाच्या आयटी सेलकडून व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.