Shashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेट

Continues below advertisement

Shashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेट  

हेही वाचा :

राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) 15 डिसेंबरला झाला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र अद्याप मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेलं नाही. परंतु महायुती सरकारचं खातेवाटप ठरल्याची माहिती समोर आली आहे.   येत्या 24 तासांत खातेवाटपसंबंधी निर्णय होणार आहे. शिवसेनेची यादी काल रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आज दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांत राज्यपालांना देणार संपूर्ण खाते वाटपाची यादी देणार आहे.   कसे असेल खातेवाटप? (Maharashtra Goverment All Minister Post List) गेल्या मंत्री मंडळातील महत्वाची खाती त्या-त्या पक्षाकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. गृह भाजपकडे, तर नगरविकास खातं शिवसेनेकडे राहणार आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळणार आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपच्या ताब्यात राहणार आहे. तर शिवसेनेचे उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला जाणार दिलं आहे. महत्वाचं म्हणजे भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण खातं शिवसेनेच्या ताब्यात जाणार आहे. महिला व बालविकास देखील राष्ट्रवादीकडेच राहणार आहे, अदिती तटकरेंची पुन्हा या मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram