Shraddha Walkar :तो माझे तुकडे करण्याची धमकी देतोय 2020 सालीच श्रद्धानं लिहिलं होतं पोलिसांना पत्र

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत.... आपल्यावर येणाऱ्या प्रसंगाची श्रद्धा वालकरला गेल्या दोन वर्षांपासून माहिती होती का असा विचार करायला लावणारं एक पत्र समोर आलंय... यानुसार आफताबपासून जीवाला धोका असल्याची तक्रार श्रद्दानं २०२० मध्येच केली होती... अशी माहिती येतेय.. यात आफताब गळा दाबून मारण्याची, आणि मृतदेहाचे तुकडे करण्याची धमकी देत असल्याचं या तक्रारीत नमूद आहे.... तसंच आफताबच्या संपूर्ण कुटुंबालाही त्याच्या या वागण्याची माहिती होती असंही श्रद्धानं या पत्रात लिहील्याचं समोर आलंय.  मात्र ही तक्रार दाखल केली, त्यावेळी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून आफताबला केवळ समज दिल्याची माहिती आहे.. श्रद्धानं काही काळानंतर ही तक्रार मागे घेतल्याचीही माहिती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola