Sharad Sonawane : मंत्री करा, नाहीतर मला मतदारसंघात फिरु देणार नाही,अपक्ष आमदाराची फडणवीसांना विनंती

Continues below advertisement

Sharad Sonawane : मंत्री करा, नाहीतर मला मतदारसंघात फिरु देणार नाही,अपक्ष आमदाराची फडणवीसांना विनंती

हेही वाचा : 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी झाला. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाल्याचे आहेत. जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं, असे छगन भुजबळांनी म्हटले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केलाय.

संजय राऊत म्हणाले की, महायुतीकडे  225 च्या जवळपास आकडा आहे. त्यांच्याकडे मोठे बहुमत आहे. त्यामुळे कोणाचा असंतोष बाहेर आला तरी सरकारला चटके बसतील, अशी शक्यता नाही. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत.  मधल्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुजबळ यांनी टोकाची भूमिका घेतली. आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता. कारण दोन्ही समाज महाराष्ट्रातील प्रमुख सामाजिक घटक आहेत. सगळ्यांना न्याय मिळावा ही आमच्या सगळ्यांची भूमिका असताना भुजबळ यांनी एक टोकाची भूमिका घेतली. पण ती भूमिका त्यांना घ्यायला लावली. भुजबळांचा पुरेपूर वापर त्या काळात झाला. जरांगे यांच्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर झाला असे स्पष्ट दिसत होते. नाहीतर इतकी टोकाची भूमिका भुजबळ घेऊ शकत नव्हते. ज्यांनी त्यांना टोकाची भूमिका घ्यायला लावली, त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडले हे माझे आकलन असल्याचे त्यांनी म्हटले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram