Sharad Ponkshe slam Rahul Gandhi : राजकीय स्वार्थासाठी राहुल गांधी सावरकरांवर बोलतात
ज्येष्ठ रंगकर्मी आणि मी नथुराम गोडसे बोलतोय नाटकाे अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वारंवार बोलणारे राहुल गांधी वेडसर आहेत. राहुल गांधी सावरकरांबद्दल अभ्यास न करता, वाचन न करता फक्त शिव्या देतात, कारण त्यांना राजकीय स्वार्थ साधायचा आहे, असं ते म्हणाले. तसंच आधी कधीही मंदिरात न दिसणारे राहुल गांधी राजकीय स्वार्थासाठी कोटाच्या वर जानवं घालत असल्याचं आपण पाहिलं आहे, अशी खिल्लीही शरद पोंक्षे यांनी उडवली.