Sharad Pawar | दाभोलकर हत्येच्या तपासाप्रमाणे सुशांत प्रकरणाचा तपास होऊ नये अशी आशा : शरद पवार

Continues below advertisement

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदरु करुन महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल अशी खात्री असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसंच मला आशा आहे की, या तपासाची परिणीती डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासाप्रमाणे होणार नाही, असंही पवार म्हणाले. शरद पवार यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे.

सुप्रीम कोर्टाने काल (19 ऑगस्ट) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram