Sharad Pawar Vs Sunil Shelke : शेळकेंना पवारांचा इशारा, पवारांनी शहानिशा करणं गरजेचं : शेळके
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Vs Sunil Shelke : शेळकेंना पवारांचा इशारा, पवारांनी शहानिशा करणं गरजेचं : शेळके
लोणावळ्यात आज शरद पवार गटाचा मेळावा पार पडला..या मेळाव्यात शरद पवारांनी आज अजित पवार गटाच्या एका आमदाराला ठणकावलं. 'मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या, वाटेला गेला तर कोणाला सोडत नाही' असं पवार म्हणाले. मावळचे आमदार सुनील शेळके यांना पवारांनी इतक्या तिखट शब्दांत दिम दिला. त्यामागचं कारणही जाणून घेऊयात. अजित पवार गटाच्या १००हून अधिक कार्यकर्त्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात बोलताना मदन बाफना यांनी सुनील शेळकेंवर थेट आरोप केला. कार्य़कर्त्यांनी शरद पवारांच्या कार्यक्रमाला जाऊ नये, म्हणून शेळकेंनी त्यांना दमदाटी केली असा दावा बाफना यांनी केलाय. हाच धागा नंतर पवारांनी आपल्या भाषणात पकडत, सुनील शेळकेंना थेट इशाराच देऊन टाकला.