Sharad Pawar Ghatkopar Hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी शरद पवार दाखल, अपघाताची घेतली माहिती
मुंबई : अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मुंबईला मोठा तडाखा बसला. घाटकोपर इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातात ज्या जागेवर हे अनधिकृत होर्डिंग उभं करण्यात आलं होतं ती जागा नेमकी कोणाची असा प्रश्न कालपासून विचारला जातोय, याचा पाठपुरावा एबीपी माझानं केला आहे. ज्या जागेवर कोणतीही नियम न पाळता हे अनधिकृत होर्डिंग (Ghatkopar Hording) उभं करण्यात आलं होतं ती जागाच मुळात रेल्वे पोलिसांची आहे, जो पेट्रोल पंप या ठिकाणी चालवण्यात येतात तो देखील रेल्वे पोलिसांचा होता, या ठिकाणी जमा करण्यात आलेल्या सगळ्या रेवेन्यू हा रेल्वे पोलिसांना आणि काही प्रमाणात पेट्रोल पंप चालवत असलेल्या मालकाला जात होता, ही अतिशय धक्कादायक अशी माहिती आता समोर आलेली आहे. तसंच हे होर्डिंग अनधिकृत आहे नियम धाब्यावर बसवून उभारले जात आहे याची कल्पना रेल्वे पोलिसांना नव्हती का? असाही सवाल आता उपस्थित होतोय.