Sanjay Rathod प्रकरणी शरद पवार नाराज, तपास पूर्ण होईपर्यंत पदापासून दूर राहण्याची भूमिका : सूत्र
पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोड अडचणीत आले आहेत. कारण महाविकास आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार हेच या प्रकरणी नाराज असल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. संजय राठोड प्रकरणाचा फटका महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला बसत असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केल्याचे समजते. जोपर्यंत या प्रकरणाचा तपास होत आहे तोपर्यंत संजय राठोड यांनी मंत्रीपदापासून लांब राहावे अशी शरद पवार यांची भूमिका असल्याची माहिती आहे.