Sharad Pawar Uncut PC : मी पुन्हा येणार म्हणणारे अस्वस्थ ; शरद पवार यांचं संपूर्ण भाषण ABP Majha

Continues below advertisement

पिंपरी चिंचवड : आजची देशाची आणि राज्याची परिस्थिती आगळी-वेगळी आहे. गेल्या 54 वर्षांत मी अनेक सरकार पाहिली. राज्याच्या बाबतीत केंद्राची भूमिका सहानुभूतीची असायची, पण सध्याचे केंद्र सरकार राज्य सरकारला खासकरून विरोधकांची सत्ता असणाऱ्या ठिकाणी कोंडी केली जात आहे. यासाठी यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, असे म्हणत  शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

केंद्र सरकारला सामान्य लोकांविषयी आस्था नाही. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  केंद्र सरकार सामान्य माणसाला महागाईच्या दरीत ढकलतंय आजची देशाची आणि राज्याची परिस्थिती आगळी-वेगळी आहे. सामान्यांचे प्रश्न वाढत आहेत. पण केंद्राला याची आस्था नाही. प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतच आहेत हे असं कधी घडलं नव्हतं. केंद्र म्हणतं आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने हे होतंय. पण काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी केंद्राने आपल्या देशात किमती कमी केल्या नाहीत. इतर देशात मात्र किंमती कमी होतायेत. केंद्राने या दरवाढीतून उत्पन्न वाढविण्याचे स्रोत निर्माण केले आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सलग दहा दिवस पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तेव्हा भाजपने ओरड सुरू केली होती. पण आज मात्र ते  गप्प आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram