Sharad Pawar on IT Raid : पाहुण्यांनी अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये : शरद पवार ABP Majha
Continues below advertisement
पाहुण्यांनी अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये असा टोला लगावत शरद पवार यांनी अजित पवारांच्या नातेवाईकांवरील आयकर छापेमारीचा समाचार घेतलाय. सत्तेचा गैरवापर करून राज्यात केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई करून घेतली जात असल्याचा घणाघाती आरोपही पवारांनी केलाय. एनसीबीपेक्षा मुंबई पोलिसांनी अधिक अंमली पदार्थ जप्त केले. क्रूझवरील छाप्यावेळी गोसावी फरार होते मग ते पंच कसे? देशमुखांच्या मालमत्तांवरील ५ छाप्यांमधून काय मिळालं? देशमुखांवर आरोप करणारे पोलिस अधीकारी आहेत कुठे? असे प्रश्न विचारत त्यांनी एनसीबी कारवाई आणि परमबीर प्रकरणावरूनही टीका केलेय.
Continues below advertisement