Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची खेळी?

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकोल्याचा दौरा केला असून, या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे मोठे बंधू भीमराव आंबेडकर यांच्यासोबत शरद पवार एकाच मंचावर दिसले, ज्यामुळे महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय पंडितांमध्ये सुरू झाली आहे. 'हे जरी राजकीय व्यासपीठ नसले तरी, या दोन नेत्यांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्रात भविष्यात कोणते राजकीय समीकरण उदयास येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल', अशी चर्चा आहे. अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते पत्रकारिता महाविद्यालयाची इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ३० फुटी पुतळा आणि २४ तास फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार यांचीही उपस्थिती होती. या दौऱ्यात शरद पवार यांनी कान्हेरी येथील फार्म हाऊसवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola