Sharad Pawar 160 Seats Offer | निवडणूक घोटाळ्यावर राहुल गांधींनंतर शरद पवारांचा बॉम्ब
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत १६० जागा जिंकून देण्याची ऑफर आपल्याला मिळाली होती, असे पवारांनी म्हटले आहे. ही ऑफर घेऊन दोन व्यक्ती भेटल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. मात्र, ते दोघे कोण, याचा उलगडा पवारांनी केलेला नाही. या दोघांची भेट राहुल गांधींशी घालून दिली होती, असे पवारांनी स्पष्ट केले. "अशा प्रकरणात आपण पडायला नको," असे माझे आणि राहुल गांधींचे मत झाले, असे पवारांनी सांगितले. राहुल गांधी निवडणूक आयोगावर करत असलेल्या मतचोरीच्या आरोपांना पवारांच्या या दाव्यामुळे एकप्रकारे बळकटी मिळाली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी पवारांच्या या आरोपांच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्ताधाऱ्यांच्या मते, अजित पवार यांना महाराष्ट्राच्या २८९ विधानसभा जागांपैकी १०० जागांवर उमेदवारीची हमी दिली होती. पवारांच्या या भूमिकेला गांभीर्याने घेतले जात नाही, असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे.