Maharashtra Politics : धाराशिवमध्ये राष्ट्रवादी मविआतूनच लढणार, नव्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत निर्णय
Continues below advertisement
धाराशिवमधील आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंग पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग म्हणूनच या निवडणुका लढवेल. डॉक्टर पाटील यांनी म्हटले आहे की, 'ज्या ठिकाणी आपला उमेदवार जिंकू शकतो तिथे महाविकास आघाडीतून ती जागा आपल्याकडे कशी राहील यासाठी प्रयत्न केले जातील'. पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. यावेळी जवळपास साठ कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे, जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना संधी देऊन महाविकास आघाडीमध्ये आपले स्थान बळकट करण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement