Pawar Politics: 'अजित पवारांवर फक्त नाराजी', काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांचे सूचक वक्तव्य

Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची नांदी दिसू लागली असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहित पवार यांनी एक सूचक विधान केले आहे, 'पक्ष फोडल्यामुळे आमचा भाजपवर राग आहे पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराजी आहे.' या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या बैठकीत स्थानिक परिस्थितीनुसार युतीचे निर्णय घेण्याचे अधिकार पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐनवेळी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे यांची शिवसेना किंवा मनसे यांच्यासोबतही शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तडजोड करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रोहित पवारांच्या वक्तव्यामुळे काका-पुतण्या पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola