Farmers Protest: 'सढळ हाताने मदतीची सरकारची तयारी दिसत नाही', Sharad Pawar यांचा आरोप

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अपुऱ्या मदतीवरून सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ, पक्षाने राज्यव्यापी 'काळी दिवाळी' पाळत निषेध नोंदवला. 'संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सढळ हाताने मदत करण्याची सरकारची तयारी दिसत नाही,' अशी थेट टीका शरद पवार यांनी केली आहे. या आंदोलनांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात निदर्शने करण्यात येत असून, शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याचे पक्षाने म्हटले आहे. मदतीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याची इच्छा नसली तरी, सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याचा आरोप पवारांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola