Mandal Yatra | Sharad Pawar यांच्या NCP च्या 'मंडल यात्रे'ला विरोध, '१९९० च्या अराजकते'ची भीती!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'मंडल यात्रे'ला नागपूरमधून सुरुवात झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शशिकांत शिंदे आणि रोहित पवार या यात्रेसाठी उपस्थित आहेत. मात्र, जयंत पाटील हे या यात्रेला उपस्थित नाहीत. हिंदू महासंघाने या 'मंडल यात्रे'ला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, "देशाला पुन्हा एकदा १९९०च्या अराजकतेमध्ये घेऊन जाण्याचा माननीय शरद पवार साहेबांचा प्रयत्न आहे असं हिंदू महासंघ स्पष्ट मानतो." मंडल आयोगामुळे अनेक युवकांचे बळी गेले आणि देशात हिंसेचे वातावरण निर्माण झाले होते, असे हिंदू महासंघाचे म्हणणे आहे. तसेच, ओबीसी समाजाला त्यातून फारसे काही मिळाले नाही, असेही त्यांनी नमूद केले. तब्बल चार वर्षांनंतर ओबीसी समाजाच्या पूर्ण समाधानानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत असताना, पुन्हा एकदा जातीचे राजकारण करून लोकांना भडकावण्याचे काम या 'मंडल यात्रे'मुळे होईल, अशी भीती हिंदू महासंघाने व्यक्त केली आहे. त्यामुळे, या यात्रेला परवानगी देऊ नये, अशी स्पष्ट विनंती हिंदू महासंघाने शासनाला केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola