Maharahtra Politics : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) चिरंजीव जय पवार (Jay Pawar) यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच, राज्यात 'बोगस मतदार' (Bogus Voters) यादीवरून राजकीय वातावरण तापले आहे. 'कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत (BJP) युती करू नका', असा स्पष्ट आदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बीडमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे. दुसरीकडे, भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दुबार मतदारांवरून केवळ हिंदू-मराठी नावांवरून प्रश्न का, असा सवाल करत विरोधकांवर तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. यावर MNS नेते संदीप देशपांडे यांनी शेलारांवर टीका केली, तर शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी 'तुम्हीच मोर्चा काढा' असे आव्हान दिले. नंदुरबारमध्ये (Nandurbar) लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने काँग्रेसचे काम केल्याचा आरोप करत माजी खासदार हिना गावित (Hina Gavit) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. तसेच, हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध कायम असल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव (Narendra Jadhav) यांच्या भेटीत स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement