Pawar Land Scam: Parth Pawar प्रकरणावर शरद पवार, विजय कुंभार, उदय सामंत यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
पुण्यातील पार्थ पवार (Parth Pawar) जमीन घोटाळा प्रकरणी राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार (Vijay Kumbhar) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. ‘कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं,’ अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. त्यांनी या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून समाजासमोर ठेवण्याची मागणी केली. दुसरीकडे, पार्थ पवार यांच्या अमेडिया (Amedia) कंपनीला वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द झाला असला तरी, मुद्रांक शुल्क म्हणून बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत. मात्र, आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दावा केला आहे की, कंपनीला बेचाळीस कोटी नव्हे, तर सुमारे १७५ कोटी रुपयांचा 'नजराणा' भरावा लागू शकतो. कायदेशीर प्रक्रियेनुसार, व्यवहार रद्द करण्यासाठी दोन्ही पक्षांनी समक्ष हजर राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी मंत्री उदय सामंत यांनी आपल्या विभागाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola