Sharad Pawar on Election Results तीन राज्यात BJP जिंकले तरी 2024 मध्ये महाराष्ट्रात पराभव निश्चित
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar on Election Results तीन राज्यात BJP जिंकले तरी 2024 मध्ये महाराष्ट्रात पराभव निश्चित
सातारा : मध्यप्रदेश (MP Election), राजस्थान (Rajasthan Election) , छत्तीसगड (Chhattisgarh Election) या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. मात्र आजच्या निकलाचा परिणाम 2024 मध्ये होणार नाही. महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता येणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला. ते साताऱ्यात बोलत होते. सध्या तरी मोदींना (PM Modi) अनुकुल असा ट्रेण्ड आहे, तो मान्य केला पाहिजे, असे देखील शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
शरद पवार म्हणाले, आजच्या निकालाचा परिणाम इंडिया आघाडीवर होणार नाही. भाजपला अनुकूल ट्रेन्ड सध्या दिसतोय हे मान्य केला पाहिजे. मंगळवारी 6 वाजता इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. राज्यातील जाणकारांकडून माहिती घ्यायची आहे. खरी माहिती येत नाही तोपर्यंत ईव्हीएमला दोष देता येणार नाही. मंगळवारी 6 वाजता इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे.