ABP News

Sharad Pawar Vs Ajit Pawar Special Report : ...म्हणून अजित पवारांना तेव्हा मुख्यमंत्रीपद दिलं नाही

Continues below advertisement

Sharad Pawar Vs Ajit Pawar Special Report : "...म्हणून अजित पवारांना तेव्हा मुख्यमंत्रीपद दिलं नाही"

२००४ साली अजित पवार नवखे होते. त्यामुळंच त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं नाही. सगळं काही देऊनही पक्षात काम करायला मिळालं नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे. त्यावेळी भुजबळ किंवा इतरांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता. कुटुंबप्रमुख म्हणून मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यात कधीही भेद केला नाही. अजित पवारांना पक्षानं काय कमी दिलं ? उपमुख्यमंत्रिपद, मंत्रिपद, विरोधी पक्षनेतेपद अशी विविध पदे दिली. सुप्रिया सुळे या चार वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र लोकसभेपुरतेच सीमित होतं. विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवारांकडे साऱ्या राज्याची सूत्रे होती. एवढे सारे होऊनही पक्षात मला काम करण्यास संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram