Maharashtra Politicsप्रकरणाची वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवावी,पार्थ पवार जमीन घोटाळ्यावर शरद पवारांचं मत

Continues below advertisement
पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात (Pune Land Scam) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर झालेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही, याचं उत्तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) देऊ शकतील', असे शरद पवार म्हणाले आहेत. मुख्यमंत्री म्हणतात हा विषय गंभीर आहे, तर त्यांनी याची चौकशी करून सत्य समाजासमोर ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली. कुटुंब आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असे सांगत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आमच्या कुटुंबातही आम्ही एकमेकांविरोधात निवडणुका लढवल्या आहेत, राजकारणात विचारधारा महत्त्वाची असते, कुटुंब नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola