Sharad Pawar Full PC : मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर प्रश्नचिन्ह, शरद पवारांनी व्यक्त केली शंका
Continues below advertisement
Sharad Pawar Full PC : मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर प्रश्नचिन्ह, शरद पवारांनी व्यक्त केली शंका
राज्य सरकारने विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर केला आहे. असं असताना हे मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल की, नाही याबाबत शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. राज्य सरकारने मंगळवारी मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा ठराव विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
Continues below advertisement