Sharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

Continues below advertisement

Sharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं
ज अनेक दिवसातून मी आपल्या गावी आलो. 1965 सालि मी बारामती तालुक्यात समाजकारणाला सुरवात केली. अनेक गावात माझं जाणं येणं होतं. पाण्याची कमतरता होती. गव्हावर तलाव बाधायला काढला दिवसाची मजूरी म्हणून २-३ किलो गहु दिला जायचा. लहाम मोठे बंधारे बांधले.आणि थोडी फार पाण्याची सोय झाली. नंतर पुढे जानाई शिरसाई चा जन्म झाला. सर्वांना पाणी येत असेल मी म्हणत नाही पण थोड फार तरी येत असेल आणि चित्र बदललं शेतीला जोडधंदा म्हणून संकरीत गाई ही संकल्पना या भागात राबवली. एक लाख लिटर दूध उत्पादन वाढले. दूधावर प्रक्रिया करणारे उद्योग आणले. शेती संकटात असेल तर काहीतरी जोडधंदा असायला हवा. एक काळ असा होता बारामतीच्या बाजारपठेत जो माल यायचा तो गाडीत भरणारी लोक चौधरवाडी,तांदुळवाडीचे होते. आज चित्र बदललं आहे,सर्वांची घरं स्लँब ची झाली आहेत. राजकारणाचा उपयोग लोकांच्या जिवणात बदल झाला तर त्याला अर्थ. आज बारामतीचा चेहरा बदलला. शिक्षणाची दालणे उघडली.विद्या प्रतिष्ठाण मध्ये 31 हजार मुले मुली शिकतात. मुल शिकली पाहिजेत त्यांनी जगाच्या कानाकोप-यात कुठही जाव या पध्दतीचं राजकारण या भागात झाल त्याला कारण आहे तुम्ही लोक.  माझ्या जबाबदारी वाढल्या. मला चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री केलं.सर्व सत्ता अजित दादांच्या हातात दिली.. निर्णय तुम्ही घ्यायचे निवडणूका तुम्ही घ्यायच्या.त्यांनी २५ - ३० वर्षे त्यांनी ते काम केलं याबाबत माझ्या मनात शंका नाही. पुढची तयारी करायची की नाही ? पुढची तयारी करायची असेल तर नेतृत्व आहे.ते तयार करावं लागेल. संधी सर्वांना द्यायची असते. जिरायत भागाने मला द्यायला कधी कमी केलं नाही.  सुप्रियाचा देशात संसदेत आज नंबर दुसरा आहे.तुम्हा लोकांच नांव देशात गेलं आहे. तुम्हा लोकांचा नांव लौकिक महाराष्ट्राच्या बाहेर गेला.  समाजाच्या प्रश्नाचा अभ्यास पाहिजे,कारखानदारीचा अभ्यास पाहिजे.आज  एक एम आय डि सी काढली.त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळाला.  याच कामाला गती द्यायची असेल तर जाणकार आणि कष्ट करणारा प्रतिनिधी निवडला पाहिजे म्हणून युगेंद्र ची निवड केली.आता काम तुमचं आहे. माझी निवडणूक असो अजित दादाची निवडणूक असो सुप्रियाची निवडणूक असो तुम्ही कधी नाही म्हणाला नाही,मत द्यायला कमी केलं नाही. माझं आग्रहाचं सांगण आहे तुमच्या गावाचा आजपर्यंतचा जो लौकीक होता तोच तुम्ही पुढे युगेंद्रच्या बाबतीत कराल. घराघरात चिन्ह पोहचवा मतदान कसं होईल ते पहा.   उद्यापासून मी महाराष्ट्रात आहे. उद्या माझी मुंबईत सभा नागपूर कोकण पश्चिम महाराष्ट्रात जाणार आणि शेवटी बारामतीत येणार १८ नोव्हेंबर ला बारामतीत सांगता सभेला येणार युगेंद्रच काम शेवटच्या माणसापर्यंत पोहचवा तुम्ही तुमचा काम चोख कराल

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram