Sharad Pawar on Rajesh Tope : यावेळी सुटलात, पुढच्या वेळी पाहतो; पवार राजेश टोपेंना काय म्हणाले?
Sharad Pawar on Rajesh Tope : यावेळी सुटलात, पुढच्या वेळी पाहतो; पवार राजेश टोपेंना काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले, पंतप्रधानांच्या मनात एक आकस आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी आकस आहे. त्यांनी यांच्या विषयात चुकीचे वक्तव्य केले. देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी आकस करणं म्हणजे नेतृत्व किती कोत्या वृत्तीचे आहे हे समोर येत. आजपासून 70 दिवसात आचार संहिता येणार आहे. सगळ्या पक्षांनी एकत्र येवून महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याचं काम करायचे आहे. आघाडीचा सदस्य म्हणून खात्रीने सांगतो. महाराष्ट्रचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम करू, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला. जालना जिल्ह्याच्या इंडेक्स बघितला तर शेवटचा नंबर लागतो कल्याण काळे म्हणाले, जालना जिल्ह्याच्या इंडेक्स बघितला तर शेवटचा नंबर लागतो. देशाचे संविधान वाचवण्याचे काम शरद पवार यांनी केले. निलेश लंके यांनी शपथ इंग्रजीत घेतली आणि शेवटी रामकृष्ण हरी म्हणाले. बरे झाले वाजवा तुतारी म्हणाले नाही. दुधाच्या दरा संदर्भात शरद पवार यांनी बाजू घ्यावी. मनोज जरांगे यांनी जे आंदोलन सुरू केले आहे, त्या बाबत भूमिका शरद पवार यांनी घेतली पाहिजे, असंही कल्याण काळे म्हणाले.