Sharad Pawar on Raj Thackeray : आठ-दहा दिवसांनी जेव्हा जाग येईल तेव्हा राज ठाकरे बोलतात

Continues below advertisement

Sharad Pawar on Raj Thackeray : आठ-दहा दिवसांनी जेव्हा जाग येईल तेव्हा राज ठाकरे बोलतात

पुणे : अवघ्या महाराष्ट्राला आज पंढरीच्यां (Pandharpur) पांडुरंगाचे आणि चंद्रभागेच्या तिरी जमलेल्या वैष्णवांच्या मेळ्याचे वेड लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केल्यानंतर सोशल मीडियावरही विठुरायाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत हेत. राज्यातील सर्वच बडे नेते आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राला आणि वारकऱ्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यासोबतच महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, समृद्धीसाठी आणि जनतेसाठी बा विठ्ठलाला साकडे घालत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना वारीची परंपरा आणि एकोप्यावर भाष्य केलं आहे. आत, शरद पवारांना (Sharad Pawar) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) ट्विटसंदर्भात विचारले असता, त्यांनी पवारस्टाईलने चिमटा काढला अन् एकच हशा पिकल्याचं दिसून आलं.  

राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषणाला बसला आहे. जातीय तणावात सध्याचा महाराष्ट्र आणि ग्रामीण भाग पहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने राज ठाकरेंनी ट्विट करुन, ''आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.'', असे म्हटले आहे. राज ठाकरेंच्या ट्विटच्या अनुषंगाने शरद पवार यांना पुण्यातील पत्रकार परिषदेतून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना, शरद पवारांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram