Sharad Pawar On khadse | भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवार म्हणतात...
Continues below advertisement
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षाला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. परंतु शरद पवार यांनीही यावर विषयावर थेट वक्तव्य करण्याऐवजी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. राजकीय कर्तृत्त्वाची भाजप नोंद घेत नसल्याची खंत खडसेंना वाटत असेल, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली. तुळजापूरमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची शक्यतांबाबत शरद पवार यांना विचारणा केली. "खडसे हे विरोधीपक्षनेते होते, अर्थमंत्री होते. एका पक्षाच्या उभारण्यात त्यांचं फार योगदान होतं. त्यांच्या त्यागाची नोंद घेतली जात नसल्याने ते सध्या पक्षांतराच्या विचारात असतील, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
Continues below advertisement