Sharad Pawar on CAA : हा संसदीय लोकशाहीवर आक्रमण, CAA वर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Continues below advertisement

Sharad Pawar on CAA : केंद्रीय गृहमंत्रालयाने आज (दि.11) सीएएच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना काढली आहे. दरम्यान सीएएच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "निवडणूक आयोग येत्या तीन चार दिवसांमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची वेळ आली असताना अशाप्रकारचा निर्णय घेऊन मोदी सरकारने संसदीय लोकशाही पद्धतीवर हा सूड आहे. ज्याचा आम्ही निषेध करतो", असं शरद पवार म्हणाले. ते बारामती येथे बोलत होते. 

संस्थांची प्रतिष्ठा राज्यकर्ते ठेवत नाहीत

शरद पवार म्हणाले, नवीन संसदेत लोकसभा आणि राज्यसभा एकत्र येऊ नये अशी व्यवस्था मोदींनी केली. याआधी आम्ही सगळे जाऊन गॅलरीत जाऊन बसायचो. या संस्थांची प्रतिष्ठा राज्यकर्ते ठेवत नाहीत. आज देशाचे संविधान वाचवायचे आहे. चांगले प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. लोकांना बदल हवा आहे पण बदल असलेली विचारधारा त्यांना हवा आहे, असंही पवार यांनी नमूद केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram