Sharad Pawar Speech Kolhapur:बोलताना धाप,मध्ये-मध्ये खोकला,व्हाईट आर्मीच्या कार्यक्रमात पवारांचे धडे
Sharad Pawar Speech Kolhapur:बोलताना धाप,मध्ये-मध्ये खोकला,व्हाईट आर्मीच्या कार्यक्रमात पवारांचे धडे
व्हाईट आर्मीच्या माध्यमातून शरद पवार यांना आपत्ती वेळी धावणारा महायोद्धा पुरस्कार दिला जाणार आहे.. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल व्हाईट आर्मीच्या माध्यमातून शरद पवार यांना आपत्ती वेळी धावणारा महायोद्धा पुरस्कार दिला जाणार आहे....शरद पवार व्यासपीठावर आले आहेत... या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज, कुलगुरू डॉ. डी के शिर्के... कोल्हापूर - शरद पवार बोलतायत - बोलताना धाप लागत असताना... खोकला येत असताना.. देखील शरद पवार यांचे आपत्ती व्यवस्थापनावर धडे.. मला व्हाईट आर्मी बाबत फारशी महिती नव्हती मात्र अशोक रोकडे यांच्याकडून या संघटनेची माहिती घेतली ज्या पद्धतीने ही संघटना आपत्ती मध्ये झोकून देऊन काम करते ते पहिल्यावर मला या पुरस्कारासाठी नाही म्हणता आलं नाही लातूर भूकंपा वेळी मी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी किल्लारी ला पोहचलो होतो तिथली परिस्थिती खूप विदारक होती मी शेजारच्या सोलापूर मध्ये ऑफिस थाटल राज्यातील सर्व यंत्रणा कामाला लावली...राज्याच्या जनतेन ही त्यावेळी खूप मदत सहकार्य केल त्या वेळी प्रशासकीय यंत्रनेने देखील झोकून देऊन काम केल त्यावेळी प्रधानमंत्री देखील लातूर ला येऊ इच्छित होते मात्र तुम्ही आलात तर सर्व प्रशासकीय यंत्रणा तुमच्या मागे लागेल आणि इथलं काम थांबेल असं मी त्यांना स्पष्ट बोललो इतिहासात पाहिल्यांदाच एक मुख्यमंत्री एका पंतप्रधानल माझ्या राज्यात येऊ नका असं सांगत होता मात्र लोकां च्या मदतीत खंड पडू नये हा त्या मागचा हेतू होता मुंबई बॉम्ब स्फोट वेळी देखील लोकांना धीर दिला...दुसऱ्या दिवशी पुन्हा मुंबईच जन जीवन सुरळीत होईल याची खबरदारी घेतली कारण मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बस दिसली की लोकांना पटत सगळं सुरळीत चाललंय...या मानसिकतेची मला माहिती होती त्यावेळी आम्ही शेअर मार्केट देखील सुरु केले मुंबई साखळी बॉम्ब स्फोट झाला ती सर्व ठिकाणी हिंदू रहिवाशी क्षेत्र आहेत ही माहिती मला समजली यातून मी काय ओळखायचं ते ओळखलं हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता मी रेडिओ वरून बॉम्ब स्फोट झालेली 9 ठिकाणी खरं सांगितली आणि एक ठिकाण जाणीवपूर्वक खोटं सांगितलं महमद आली रोड वर सुद्धा बॉम्ब स्फोट झाल्याचं मी सांगितलं यातून बॉम्ब स्पॉटत फक्त हिंदू च नाही तर मुस्लिम सुद्धा टार्गेट आहेत हा संदेश गेला याचा परिणाम म्हणजे 24 तासात मुंबई शांत झाली अनेक देशात फिरल्यावर माझ्या लक्षात आलं देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा हवा आणि तो करायला ही लावला आज देशात कोणतीही आपत्ती आली तरी या कायदा द्वारे मदत होते याचा आनंद आहे....