Delhi NCP Meeting : दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, अजित पवारांचा आक्षेप
abp majha web team
Updated at:
06 Jul 2023 05:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दिल्लीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरु आहे... २ जुलैला अजित पवार यांनी ८ आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केलाय. काल मुंबईत शरद पवार आणि अजित पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या पार्श्वभूमीवर पवारांनी आता दिल्लीत कार्यकारिणीची बैठक बोलावली.. या बैठकीवर आता अजित पवारांनी आक्षेप घेतलाय.. बैठक बेकायदेशीर असल्याचा अजितदादांनी आरोप केलाय.