Sharad Pawar NCP : आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवार
Continues below advertisement
आज सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली..आजच्या बैठकीतून शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकले..आगामी निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांना देणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं..तसंच लोकसभेतील पराभवानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवार पक्षाने प्लॅन केलाय.. गावागावत ग्रामसभेत ठराव करण्याचं आवाहन बैठकीत करण्यात आलंय. तर ठरावामध्ये आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्याचं आवाहन करण्यात आलंय.. यासोबतच जालना, बीड, परभणी जिल्ह्यातील परिस्थितीबाबतही शरद पवारांनी चिंता व्यक्त केलेय.
Continues below advertisement