Sharad Pawar meet Narendra Modi : शरद पवार आणि मोदींची भेट, पंतप्रधान कार्यालयात २०-२५ मिनिटं चर्चा
राज्यात ईडीच्या कारवाया सुरु आहेत.. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. त्यातच राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झालीय. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांची भेट झालीय. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २० ते २५ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. याआधी १७ जुलै २०२१ रोजी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट झाली होती. त्यातच आता महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदी-पवार भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय.
Tags :
Shiv Sena Sanjay Raut Sharad Pawar Narendra Modi Uddhav Thackeray Narayan Rane Chief Minister Shiv Sena