Wankhede Lounge: 'ग्राउंड्समन, क्लब सेक्रेटरीज हेच खरे स्टार', MCA अध्यक्ष Ajinkya Naik यांचे वक्तव्य
Continues below advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) वानखेडे स्टेडियमवरील (Wankhede Stadium) वातानुकूलित लाउंजचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) म्हणाले, 'जे स्टार आहेत म्हणजे आमचे मैदान, क्लब, सेक्रेटरीज, त्यांना कुठेतरी एक वातानुकूलित जागा असली पाहिजे'. एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी बीसीसीआयचे (BCCI) आशियाई क्रिकेट कौन्सिलमधील (ACC) प्रतिनिधी आशिष शेलार (Ashish Shelar), एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. एमसीएशी संलग्न असलेल्या क्लब्सच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांसाठी हा विशेष लाउंज बनवण्यात आला आहे. जे मैदानावर नियमितपणे क्रिकेट आणि खेळाडू घडवण्याचे काम करतात, त्यांच्यासाठी ही एक समर्पित जागा असेल, असेही सांगण्यात आले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement