Sharad Pawar गटाकडून कोणत्या नाव आणि चिन्हाचा विचार? शरद पवार काँग्रेस की शरद स्वाभिमानी पक्ष?
Sharad Pawar गटाकडून कोणत्या नाव आणि चिन्हाचा विचार? शरद पवार काँग्रेस की शरद स्वाभिमानी पक्ष?
महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे, असा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिला आहे. पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलं आहे, तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाला हा अतिशय मोठा धक्का आहे. कारण महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातून याआधीच पक्ष गेला होता, त्यात आता शरद पवारांची देखील भर पडली आहे.