ABP News

Sharad Pawar Govind Baug : राष्ट्रवादीतील फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच पाडवा ; समर्थकांची मोठी गर्दी

Continues below advertisement

बारामतीत शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत पवार कुटुंबाचा दिवाळी पाडवा साजरा होत आहे. सर्व पवार कुटुंबीय या सोहळ्यासाठी एकत्र आले आहेत. राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जमले आहेत. दरम्यान शरद पवारांच्या समर्थकांनी या सोहळ्यात जोेरदार घोषणाबाजी केलीय. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर साजरा होत असलेला हा पहिलाच दिवाळी सण आहे. त्यामुुळे व्यासपीठावर शरद पवारांसह अजित पवारही व्यासपीठावर येणार का याची उत्सुकता आहे. त्यातच पवारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत शरद पवारांना आपलं समर्थन असल्याचं दाखवलंय. शरद पवार, सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांची भेट घेत शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. दरम्यान गोविंद बागेबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram