Sharad Pawar Full Speech : हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही, दणदणीत विजायनंतर पवारांचा इशारा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar on Nilesh Lanke, Ahmednagar : "खर सागायचं म्हणजे निलेश लोकसभेत चालल्यानंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे. जे आमचे सभासद आहेत, त्यामध्ये जुने सभासद आहेत. त्यांना पार्लमेंटमध्ये सगळेजण नक्की विचारतील, हा कोण गडी याठिकाणी आणला. मी त्यांना सांगितलं, तिथे मराठीत सुद्धा भाषण करता येत. तुम्ही मातृभाषेत बोलू शकता. एकदा का माईक हातात आला तर निलेशजी मराठीमध्ये काय बोलतील याचा भरोसा नाही. त्याबद्दल कमतरता भासणार नाही", असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापनदिन अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलाय. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील (Jayant Patil) आणि राष्ट्रवादीचे खासदार उपस्थित होते.
मला यंदाच्या वर्षी संसद आणि विधानसभेत जाऊन 56 वर्षे पूर्ण होतील
शरद पवार म्हणाले, मला यंदाच्या वर्षी संसद आणि विधानसभा इथं जाऊन 56 वर्षे पूर्ण होतील. आणखी किती वर्ष राहायचं? मला एकाही दिवसाची सुट्टी नाही, असं काम महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर सोपवले. त्यामुळे माझ्याकडे जे ज्ञान असेल ते नव्या 8 खासदारांच्या मागे असेल. सुदैवाने सुप्रिया आणि अमोल कोल्हे हे अनुभवी सदस्य त्यांच्यासोबत आहे. दोघांनाही संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांचीही मदत नव्या लोकांना होईल. जिल्ह्यातील प्रश्न संसदेत मांडले जातील. नवे खासदार अष्टप्रधानमंडळाप्रमाणे महाराष्ट्राच्या हिताची जपवणूक करतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.