Sharad Pawar Full PC : मोदींच्या 18 सभा, 14 जागी पराभव; काय काय म्हणाले शरद पवार ?
Sharad Pawar Full PC : मोदींच्या 18 सभा, 14 जागी पराभव; काय काय म्हणाले शरद पवार ? राज्य सरकारने आपला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) 28 जून रोजी सादर केला. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने अनेक आकर्षक घोषणा केल्या. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महिला, तरुण, शेतकरी यांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोकळ घोषणा केल्या आहेत, असा दावा विरोधकांनी केलाय. त्यानंतर आता खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनीदेखील या अर्थसंकल्पावर भाष्य केलं आहे. खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार? असे शरद पवार म्हणाले. खिशात 70 रुपये असताना.... शरद पवार हे कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी अर्थसंकल्पतील गोष्टी बाहेर आल्या होत्या. विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टी अर्थसंकल्पात आहेत, असे शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार? असा खोचक सवालही शरद पवार यांनीक केला. विधानसभा निवडणुकीतही लोकसभेप्रमाणेच चित्र असेल पुढ बोलताना शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव यावरही प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 पैकी 31 जागा जिंकल्या. सरकारने आमचा धसका घेतला आहे. मोदींनी राज्यात 18 सभा घेतल्या. पण सभा घेतलेल्या 14 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. मोदीच्या कामावर जनता खुश नाही, असे शरद पवार म्हणाले. आणीबाणीचा विषय काढणे योग्य नव्हते तसेच, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीचेही चित्र असेल. आमच्या आघाडीत सामूहिक नेतृत्व असेल. सध्या चालू असलेल्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेच्या अध्यक्षांनी आणीबाणीचा उल्लेख केला होता. यावरही शरद पवार यांनी भाष्य केले. लोकसभा अध्यक्षांच्या भाषणातील तो भाग त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारा नव्हता. आणीबाणीचा विषय काढण्याची गरज नव्हती. त्या विषयाला आता 50 वर्षे झाली आहेत. इंदिरा गांधी यांनी त्याविषयी दिलगीरीही व्यक्त केली होती. तो विषय काढणे योग्य नव्हते, असे शरद पवार म्हणाले.